आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या २५० पेक्षा अधिक विज्ञानविषयक कार्यक्रमांमध्ये लेखन, निर्मिती, सादरीकरण अशा वेगवेगळ्या स्तरांवर हेमंत लागवणकर यांचा सहभाग आहे. इंग्रजी भाषेतून त्यांनी लिहिलेल्या अनेक मूळ संहितांचे भाषांतर हिंदी, मराठी, कोंकणी, आसामी, पंजाबी, नेपाळी, उडिया, मल्याळम्, काश्मिरी अशा अनेक भाषांमधून करून त्यांचे सादरीकरण विविध आकाशवाणी केंद्रांवरून करण्यात आले आहे.
आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित झालेल्या या विज्ञानविषयक कार्यक्रमांच्या संहिता आणि ध्वनिमुद्रण या पृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.